संत फावस्तीना ह्यांची प्रार्थना (Chaplet of Divine Mercy)

संत फावस्तीना ह्यांची प्रार्थना (Chaplet of Divine Mercy)

हे येशू, तू मरण पावलास, पण तेथूनच मनुष्याला जीवन देणारा प्रवाह उफाळून उदयास आला व दयेचा सागर संपूर्ण जगासाठी उघडला गेला.

हे अप्रतिम जीवनाच्या झऱ्या, अगाघ दैवी दयासागरा, संपूर्ण जगाला आच्छादून टाक व आमच्यावर दयेचा वर्षाव करून स्वतःला आमच्यामध्ये रिक्त कर.

येशूच्या अतिपवित्र हृदयातून आम्हासाठी दयेचा झरा म्हणून वाहणाऱ्या रक्त व पाणी ह्यावर माझी श्रद्धा आहे.

हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर. हे येशू, दयेचा राजा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. आमेन.

हे अतिदयावंत देवा, तुझा चांगुलपणा आमच्या आकलनापलीकडे आहे. मी तुझ्या दयाळू हृदयाची आराधना करतो, स्तुती करतो. माणसांसाठी तुझ्या हृदयात पेटलेले प्रेम व ज्यांच्या तारणाची इच्छा तू धरली आहेस त्या माणसांसाठी मी तुझ्याकडे विनवणी करतो की, संपूर्ण जगावर दया दाखव. खासकरून, तुझ्या पवित्र रक्ताने ज्यांचे तू तारण केले आहेस त्या दुबळ्या पाप्यांवर दया कर.

हे दयावंत. क्रुसावर परसलेल्या येशू, तुझ्या मनोवेदना व भयंकर दुःखांतून निघालेला आक्रांत, “माझ्या देवा, माझ्या देवा, माझा त्याग का केलास?” त्या हाकेद्वारा आमचा परित्याग करू नकोस तर आमच्यावर दया कर. जेव्हा मी तुझ्या दयावंत हृदयापाशी पोहचतो तेव्हा तू मला नाकारणार नाहीस ह्याची खातरी आहे. तुझ्या अतिपवित्र दुःखसहनाच्या चांगुलपणाद्वारे मी तुला विनवतो की,(…..)

[वसईचे ब्रदर फ्रान्सिस सिक्वेरा ह्यांच्या “दयावंत येशूची भक्ती” ह्या पुस्तिकेतून ही प्रार्थना घेतली आहे.]

————————–

तुमची प्रतिक्रिया लिहा